Wed, Apr 01, 2020 00:51होमपेज › Belgaon › निकाल झाला, चला खेळू या...

निकाल झाला, चला खेळू या...

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 1:15AMबेळगाव: प्रतिनिधी

बेळगाव जिह्यात पहिली ते नववीचा निकाल मंगळवार 10 रोजी लागला. तो पाहण्यासाठी पाल्यांसह पालकांनी मराठी, कन्नड, ऊर्दू माध्यमाच्या शाळांमधून एकच गर्दी केली. निकाल झाला, चला खेळू या, अशा आनंदात विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला. अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याने काहींचे चेहरे फुलले होते तर कमी गुण मिळाल्याने काहींचे थोडे हिरमुसलेले दिसले.बेळगाव जिल्ह्यात एकूण 1726 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. पैकी बेळगावात मराठी, कन्नड  व ऊर्दू माध्यमाच्या मिळून 218 शाळा आहेत. यामध्ये माध्यमिक 92 शाळांचा सामावेेश आहे. 

मार्चमध्ये परीक्षा संपल्यानंतर पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होती. मंगळवार 10 रोजी विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी पालकांसह शाळेत दाखल झाले. सुट्टीत मामाच्या गावी, परगावी गेलेल्या मुलांनी निकाल पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी शाळेत हजेरी लावली. शाळेत प्रार्थना झाल्यानंतर आपापल्या वर्गात विद्याथ्यार्ंना बसण्याची सूचना शिक्षकांनी केली. वर्गात शिक्षकांनी निकालाच्या प्रती विद्यार्थ्यांच्या हातात दिल्या. काही विद्यार्थी सुट्टीत मामाच्या गावी गेल्यामुळे त्यांचा निकाल पालकांनी घेतला. निकाल  पाहून मुलांनी शिक्षकांना व आपल्या मित्रमंडळीना पेढे वाटून आनंद व्यक्‍त केला. प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असल्याने शाळेेचा परिसर सकाळपासून गजबजून गेला होता.  यंदा तू पास होऊन कितवीत गेलास, असे एकमेकाला विचारत असल्याचे चित्र शाळेच्या परिसरात पाहावयास मिळाले. सर्व मोबाईल कंपन्यांचे फोन दिवसभर खणखणत होते.आप्तेष्ट व मित्रमंडळींना आपल्या पाल्याचा निकाल सांगण्यात पालक दंग  होते. पै पाहुण्यांचे फोन, अभिनंदनाचा वर्षाव एकमेकावर करीत होते.  
 जिल्ह्यातील प्राथमिक 
शाळा 1726
 मराठी प्राथमिक शाळा  404
 कन्नड प्राथमिक शाळा: 1168
 ऊर्दू प्राथमिक शाळा: 154 
 बेळगावातील शाळेची आकडेवारी
 मराठी शाळा : 62
  कन्नड शाळा :119
  ऊर्दू शाळा : 37
 मराठी माध्यम हायस्कूल : 33
 कन्नड माध्यम हायस्कूल :46
 ऊर्दू हायस्कूल : 13

Tags :Result finish lets play belgaon news