Sat, Sep 19, 2020 12:18होमपेज › Belgaon › रमेश जारकीहोळींचे पुन्हा उपमुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न

रमेश जारकीहोळींचे पुन्हा उपमुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न

Last Updated: Sep 17 2020 2:12AM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय पाटबंधारे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेण्याच्या निमित्ताने दिल्लीला गेलेले पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न चालवल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात असताना काहीजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रमेश जारकीहोळी त्या बंडखोरांचे नेते होते.

 कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात त्यांची मोलाची भूमिका असल्याने त्यांना पाटबंधारेसारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले. पण, त्यांची उपमुख्यमंत्रिपदाची मागणी कायम आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न जारकीहोळी यांनी केल्याचे समजते.

मुख्यमंत्री दिल्लीला 

पूर, विकास योजना, मंत्रिमंडळ विस्तारासह प्रमुख विषयांवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा गुरुवारी नवी दिल्लीचा दौरा करत आहेत. त्यांच्याबरोबर पुत्र बी. वाय विजयेंद्र आणि उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ असणार आहेत. डझनभर आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज आहे.

 "