Sun, Mar 29, 2020 00:25होमपेज › Belgaon › कत्तलखान्यावर छापा; 45 गायींची सुटका

कत्तलखान्यावर छापा; 45 गायींची सुटका

Published On: Nov 19 2018 12:59AM | Last Updated: Nov 18 2018 10:46PMबेळगाव : प्रतिनिधी

यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हत्तरगीत बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकून 45 गायींची सुटका करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. ही कारवाई यमकनमर्डी पोलिसांनी केली असून, रात्री उशिरापर्यंत कत्तलखाना चालविणार्‍याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हत्तरगी ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा कत्तलखाना चालू होता. त्या ठिकाणाहून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार येथे जनावरांचे मांस निर्यात करण्यात येत होते. हा कत्तलखाना बेकायदा चालविण्यात येत असल्याची तक्रार यमकनमर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्याची दखल घेत रविवारी दुपारी दीड वाजता कत्तलखान्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. घटनास्थळी सुमारे 300 जनावरांची शिंगे, अवयव, कातडी, जनावरांच्या चरबीपासून डालडा बनविण्याची सामग्री जप्त करण्यात आली. कत्तलखाना चालविणार्‍या-विरोधात यमकनमर्डी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.