Thu, Jan 28, 2021 08:42होमपेज › Belgaon › प्रचार समाप्‍त; 29 जण बिनविरोध

प्रचार समाप्‍त; 29 जण बिनविरोध

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 29 2018 11:53PMबेळगाव/ बंगळूर : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार बुधवारी सायंकाळी 6 वाजता संपला. मतदान शुक्रवारी 31 रोजी  होणार असून, राज्यभरात 29 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. 3 सप्टेंबरला मतमोजणी होईल. तीन महानगरपालिका आणि 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 31 ऑगस्टला मतदान होईल. 3 महापालिकांमध्ये 814, 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 8 हजार 340 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 36 लाख 3 हदाप मतदार त्यांचे भविष्य ठरवतील. 

गुलबर्गा येथील अफझलपूरमध्ये प्रभाग क्र. 19 मधील एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने तेथे निवडणूक होणार नाही. कोळ्ळेगाल येथे प्रभाग 9 मधील बसप उमेदवाराचे निधन झाल्याने तेथेही निवडणूक होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मतदानाच्या 48 तास अगोदर जाहीर प्रचाराची सांगता केली जाते. त्यानुसार 29 रोजी सायंकाळी जाहीर प्रचार संपुष्टात आला. उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे.कोडगूमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी हानी झाली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही आठवडे लागणार असल्याने तेथील निवडणुका ऑक्टोबरअखेर घेण्याचे आयोगाने ठरविले आहे.