पणजी : प्रतिनिधी
कर्नाटकला म्हादईचे पाणी देण्याप्रश्नी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी द्विपक्षीय चर्चेची जी भूमिका घेतली आहे, यामुळे राज्यातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मागेे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी शनिवारी आदिलशहा पॅलेससमोर निदर्शनावेळी दिला. म्हादई बचाव अभियानचे प्रजल साखरदांडे म्हणाले, म्हादई प्र्रश्नाचा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला असताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कर्नाटकशी द्विपक्षीय चर्चेचा घेतलेले निर्णय चुकीचा आहे.