Tue, Jan 19, 2021 23:03होमपेज › Belgaon › निजदचे 10 उमेदवार

निजदचे 10 उमेदवार

Last Updated: Nov 15 2019 11:04PM
बंगळूर : प्रतिनिधी

निजद एकूण 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 10 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षण मतदारसंघातील जागा लढवण्यात येणार आहेत. होसकोटे येथे भाजपचे बंडखोर उमेदवार शरद बच्चेगौडा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना निजदने पाठिंबा दिला आहे. आणखी चार उमेदवारांची नावे लवकरच घोषित करण्यात येतील.

विधानसभेसाठी उमेदवार असे : चैत्रा गौडा- यल्‍लापूर, उजनेप्प कोडीहळ्ळी- हिरेकेरुर, मल्‍लिकार्जुन हलगेरी- राणेबेन्‍नूर, एन. एम. नबी- विजयनगर, के. पी. बच्चेगौडा- चिक्‍कबळ्ळापूर, सी. कृष्णमूर्ती- के.आर.पुरम, टी. एन. जवरायगौडा- यशवंतपूर, तन्वीर अहमद उल्‍ला- शिवाजीनगर, देवगाज- के.आर.पेठ, सोमशेखर- हुणसूर.

विधान परिषद उमेदवार असे : चौडरेड्डी तुपल्‍ली (आग्‍नेय पदवीधर), ए. पी. रंगनाथ (बंगळूर शिक्षक), शिवशंकर कोल्‍लूर (पश्‍चिम पदवीधर), तिम्मय्या पुर्ले (ईशान्य शिक्षक).