Sat, Feb 29, 2020 13:07होमपेज › Belgaon › काकतीजवळ महामार्गावर खून

काकतीजवळ महामार्गावर खून

Last Updated: Nov 24 2019 1:36AM
बेळगाव ः प्रतिनिधी  

पुणे-बंगळूर महामार्गावर काकती-जवळच्या बर्डे  धाब्याजवळ पूर्व वैमनस्यातून एकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे.
यल्लाप्पा हाल्लाप्पा गोरव (वय 53, रा. मुत्यानट्टी) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली, मात्र शनिवारी सकाळी उघडकीस आली. यल्लाप्पा काम संपवून  रात्री घरी परत जात असताना बर्डे धाब्याजवळ काहीजणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यात तो जागीच कोसळला. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या यल्लाप्पाचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत होता; मात्र तो खून असल्याचे निदर्शनास आले आहे. 

12 वर्षांपासून मुत्यानट्टी गावातील दोन कुटुंबात वादावादी सुरू होती. यातूनच हा खून करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.  घटनेची माहिती मिळताच,  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत यल्लाप्पा यांचा भा़ऊ सिद्धाप्पा हालाप्पा गोरव यांनी पाच संशयितांविरोधात काकती पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. संतोष सिद्धाप्पा केंप, सिद्धाप्पा यल्लाप्पा केंप, इश्‍वर हालाप्पा हालभावी, रवी बसु कुंबरगी आणि विवेक कर्‍याप्पा नाईक  अशी संशयितांची नावे आहेत. यापूर्वीही कट रचला होता याआधी यल्लाप्पा गोरव याच्यावर वाहन घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी केंप कुटुंबियांवर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

मुत्यानट्टीत दगडफेेक
खून उघडकस आल्यानंतर गावात मोठा वाद झाला. यानंतर दोन्ही कुटुंबियांकडून घरावर दगडफेक करण्यात आली. यामुळे गावातील वातावरण तणावग्रस्त बनले होते. काकती पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी गावाला भेट देऊन पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.