Mon, Jan 18, 2021 10:45होमपेज › Belgaon › महापौर निवडणूक १ मार्चला

महापौर निवडणूक १ मार्चला

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:31PMबेळगाव : प्रतिनिधी

महापौर-उपमहापौर निवडणूक 1 मार्च रोजी होणार आहे. मराठी गटाच्या वतीने महापौर आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली  असतानाच आज, गुरुवारी महापौर व उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक प्रादेशिक आयुक्‍त पी. ए. मेघण्णावर यांनी जाहीर केले. मराठी गटाच्या याचिकेवार येत्या 20 रोजी सुनावणी होणार आहे.

1 मार्च रोजी दुपारी 1 वाजता दोन्ही पदांसाठी निवडणूक होईल. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची छानणी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडेल. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी असून या पदासाठी बसाप्पा चिक्‍कलदिनी आणि सुचेता गडगुंद्री यांची नावे आघाडीवर आहेत. महापौरपदासाठी मराठी गटात उमेदवारच नाही.

उपमहापौरपद इतर मागास अ प्रवर्गासाठी राखीव आहे.उपमहापौरपदासाठी मराठी गटातून मधुश्री पुजारी आणि मीनाक्षी चिगरे यांची नावे आघाडीवर आहेत.दोन महिन्यांपासून महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत; मात्र कर्नाटक सरकारने सूडबुद्धीने जाहीर केलेल्या महापौर आरक्षणामुळे मराठी भाषिकांना बहुमत असतानाही  महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आरक्षणाविरोधात नगरसेवक अ‍ॅड. रतन मासेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने प्रशासनाला नोटीस बजावली आहे.