Sat, Sep 26, 2020 22:59होमपेज › Belgaon › मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेल होणार बंद?

मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेल होणार बंद?

Last Updated: Nov 15 2019 10:59PM
बेळगाव : प्रतिनिधी

मराठा वॉर मेमोरियल बॉईज अ‍ॅण्ड गर्ल्स हॉस्टेल बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तीन वर्षांपासून या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे.  सैनिक स्कूलचा विकास करण्याकडे लक्ष पुरवले जात आहे. 

माजी सैनिक, वीरपत्नी, आजी सैनिकानाच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी राहता यावे, म्हणून या हॉस्टेलची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी राहून शिक्षण घेऊन सैन्यात भरती व्हावे, हा हेतू होता. मात्र, काळ बदलला त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. या ठिकाणी राहून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अन्य क्षेत्राकडे वळत आहेत. त्यामुळे हॉस्टेल सुरु करण्याचा मुख्य हेतू बाजूला पडला. 1920 च्या काळात आताासारख्या सुविधा, दळणवळणाची साधने नव्हती. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी शहरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बाब लक्षात घेऊ न इंग्रजानी सैनिकांच्या मुलांना राहण्यासाठी हॉस्टेलची निर्मिती केली. तेव्हापासून आजतागायत हे हॉस्टेल सुरु आहे. मात्र, या ठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी सैन्य भरतीकडे दुर्लक्ष करत आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतके उमेदवार सैन्य भरतीत दाखल झाले आहेत. त्यापेक्षा सैनिक स्कूलचा विकास करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती ब्रिगेडिअर गोविंद कलवाड यांनी दिली.

मराठा सैनिकांनी पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात केलेल्या  देदीप्यमान कर्तृत्वाचा इंग्रजांनी केलेला हा गौरव आहे. 1920 पासून हे हॉस्टेल कार्यरत आहे. 1935 मध्ये या हॉस्टेलमध्ये 15 विद्यार्थी होते. त्यानंतर 1990 मध्ये 100 विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले.

या हॉस्टेलमध्ये जवानांच्या मुलांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. शिक्षण घेतल्यानंतर सैन्यात भरती होऊ न देशसेवा करण्याच्या हेतूने हॉस्टेल सुरू करण्यात आले. मात्र, आतापर्यंत केवळ 14 जण सेनेत भरती झाले आहेत. त्यामुळे मुळ उद्देश बाजूला पडला आहे. 
- गोविंद कलवाड,  ब्रिगेडिअर

 "