शिरगुप्पी : वार्ताहर
कागवाड-अथणी मार्गावरील लोकूर (ता.अथणी) येथे कर्नाटक-महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बसेसची समोरा-समोर टक्कर होऊन अपघात झाल्याची घटना आज रात्री 7.30 वा. च्या दरम्यान घडली. या अपघातात पलूूस (महाराष्ट्र) परिवहन महामंडळाच्या बस चालकासह पाचजण गंभीर जखमी तर सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत.
कर्नाटक महामंडळाची बस (क्रमांक केए 42 एफ-412) ही बस सांगलीहून अथणीकडे चालली होती. तर महाराष्ट्र महामंडळाची बस (क्र.एम एच. 14 बीटी 1752 ) ही यात्रा विशेष बस कोकटनूरहून पलूसकडे जात होती. या दरम्यान लोकूर येथे सदर दोन्ही बसेसची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन बसेसच्या दर्शनीभागांचा चक्काचूर झाला. सदर अपघातातील जखमींना उपचारार्थ मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.