Fri, Feb 28, 2020 22:54होमपेज › Belgaon › बेळगाव : 'त्या' म्होरक्यावर कायदेशीर कारवाई करा

बेळगाव : 'त्या' म्होरक्यावर कायदेशीर कारवाई करा

Last Updated: Jan 16 2020 2:43PM

वादग्रस्त विधान करणारा भीमाशंकरबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे राहून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान करून बेळगावची शांतता भंग केल्याचा आरोप असलेल्या भीमाशंकर या कन्नड संघटनेच्या नेत्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शहर पोलिस आयुक्त आणि पोलिस प्रमुखांना केल्या आहेत. मूठभर कन्नडीगांच्या मोरक्या भीमाशंकर याने बेळगावात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकाच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले, राकसकोप जलाशयातील विष कालवून कन्नड लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत त्यांना बेळगावच्या सीमेवर उभे करून गोळ्या घालाव्यात, अशी मागणी केली होती. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते.

अधिक वाचा : कडोली, येळ्ळुरात संमेलन होणारच

महाराष्ट्र एकीकरण समितीने भीमाशंकरच्या त्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर बेळगावची शांतता भंग करणाऱ्या भीमाशंकरला तत्काळ अटक करावी, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. भीमाशंकरवर कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात येईल असा ईशारा ही महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला होता. त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असेही निवेदनातून ईशारा देण्यात आला होता. समितीच्या या इशाऱ्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्याने घेतली असून जिल्हा पोलिस प्रमुख आणि शहर आयुक्त यांना नोटीस पाठवली आहे.

अधिक वाचा : फिल्मी स्टाईलने क्‍लीनरचा खून 

निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी स्वतःच्या सहीने पोलिस आयुक्त आणि पोलिस प्रमुख यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये भीमाशंकरवर झालेल्या आरोपांची तपासणी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनाही पाठवण्यात आली आहे.

अधिक वाचा : बेळगावात शनिवारपासून पतंग महोत्सव 

कारवाईचे नाटक...

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते किंवा मराठी जनता कोणत्याही कारणास्तव मोर्चात सहभागी झाली तर त्यांच्यावर खुनासारखे मोठे गुन्हे दाखल करण्यात येतात. पण गोळ्या घालण्याची मागणी करणाऱ्या भीमाशंकरवर कारवाई करण्यात आली नाही. तब्बल पंधरा दिवसानंतर या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई हाती घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या सुचना म्हणजे फक्त कारवाईचे नाटक आहे.