Sat, Feb 22, 2020 08:09होमपेज › Belgaon › खानापूर तालुका भाजप अध्यक्षांचा राजीनामा

खानापूर तालुका भाजप अध्यक्षांचा राजीनामा

Published On: Oct 24 2018 1:26AM | Last Updated: Oct 24 2018 1:26AMखानापूर : प्रतिनिधी

भाजपचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी  राजीनामा दिला असून, अद्याप वरिष्ठांनी तो स्वीकारला नाही. मात्र, वैयक्‍तिक कारणातून आपण राजीनामा दिला असून, यामागे कोणताही हेतू नसल्याचे  पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केलेे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. इच्छुकांनी अध्यक्षपदासाठी  वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीआधी तालुका भाजपच्या अध्यक्षपदाची चुरस पाहायला मिळाली होती. 

मात्र, केंद्रीय कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री खा. अनंतकुमार हेगडे यांनी विठ्ठल पाटील यांच्यावर कृपाद‍ृष्टी दाखविली व त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. यावरून काही काळ भाजपमधील वातावारण तंग होते.