Thu, Feb 20, 2020 15:42होमपेज › Belgaon › सर्वोत्कृष्ट विद्यापीठांत केएलई द्वितीय

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांत केएलई द्वितीय

Published On: Sep 19 2019 1:29AM | Last Updated: Sep 18 2019 9:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

क्षमता आणि न्यूनता सर्वेक्षणानंतर खासगी विद्यापीठांची कामगिरी उल्‍लेखनीय ठरली आहे. उच्च शिक्षण खात्याने आयकेअर या खासगी संस्थेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणाचा नुकताच जाहीर झाला. यामध्ये मणिपाल पहिल्या आणि केएलई विद्यापीठ दुसर्‍या स्थानावर आहे. कर्नाटक विद्यापीठ धारवाड आणि व्हीटीयूने अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे.

दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत असणार्‍या मणिपाल अभिमत विद्यापीठाने सर्वच बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अन्वेषण विभागात पाच स्टार घेणारे ते राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. संशोधन विभागात कुवेंपू विद्यापीठाने 5 स्टार मिळवले आहेत. 

संस्थापित 11 विद्यापिठांपैकी 8 विद्यापीठ अध्यापनाच्या बाबतीत सरस ठरले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा या विद्यापीठांनी अधिक गुण मिळवले आहेत. पायाभूत सुविधा आणि सामाजिक परिणामांच्या बाबतीत चार विद्यापीठांनी 5 स्टार मिळवले आहेत.

विद्यापीठांवर कुलगुरु नियुक्‍त करण्याच्या बाबतीत राजकारण सुरु आहे. काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या आहेत. निश्‍चितच हे मान खाली घालण्यासारखे असल्याचे मत उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्‍वत्थनारायण यांनी व्यक्‍त केले आहे.