Sat, Feb 29, 2020 19:43होमपेज › Belgaon › भारतीय महिला अ संघाने टी-20 मालिका जिंकली

भारतीय महिला अ संघाने टी-20 मालिका जिंकली

Published On: Dec 14 2017 3:38PM | Last Updated: Dec 14 2017 3:38PM

बुकमार्क करा

बेळगाव :  प्रतिनिधी

भारतीय महिलांच्या अ संघाने बांगलादेश महिला अ संघाचा ४० धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे भारताच्या अ संघाचे कर्णधारपद असून, तिच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १५२ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशची सुरुवातच अडखळती झाली होती. पहिल्या पाच षटकांत त्यांनी एक बाद २० धावा केल्या होत्या. विजयासाठी बांगलादेशला षटकांमागे धावांची सरासरी हवी होती. पण, सुरुवातीपासूनच त्याचे दडपण बांगलादेशच्या संघावर दिसत होते. आठ षटकांत त्यांना एक बाद ३७ धावा करता आल्या. धावांची आवश्यक सरासरी षटकांमागे ९ धावांपलिकडे गेल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. बांगलादेशकडून दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली, पण धावांची गती त्यांना राखता आली नाही. बारा षटकांत त्यांनी दोन बाद गमावून ६४ धावा केल्यानंतर त्यांचा डाव गडगडायला सुरुवात झाली. पंधरा षटकांनंतर त्यांची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली होती. शेवटच्या पाच षटकांतही त्यांच्या फलंदाज फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. अखेर त्यांचा डाव २० षटकांत ८ बाद ११२ धावांपर्यंतच मजल मारू शकला.