Thu, Feb 20, 2020 16:55होमपेज › Belgaon › अपुर्‍या निधीमुळे विकासामध्ये अडथळा

अपुर्‍या निधीमुळे विकासामध्ये अडथळा

Last Updated: Oct 18 2019 8:51PM
बेळगाव : प्रतिनिधी

प्रशासनाकडून मतदारसंघात विकासकामे राबवण्यासाठी वर्षाला केवळ 6 ते 7 लाखांचा निधी मिळतो. हा निधी अत्यल्प असून यामध्ये विकासकामे होत नाहीत. यामुळे सरकारने प्रत्येक जिल्हा पंचायत सदस्याला किमान 25 ते 30 लाखाचा निधी वर्षाला द्यावा, अशी मागणी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी केली.

जि. पं. ची विशेष सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. यावेळी पाटील यांनी विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला. व्यासपीठावर अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. उपस्थित होते.

पाटील म्हणाल्या, जि. पं. च्या मतदारसंघाची व्याप्ती मोठी असते. कार्यक्षेत्रात अनेक समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी प्रशासनाने अधिक निधी पुरवणे गरजेचे असत. परंतु प्रशासनाकडून अत्यल्प निधी मिळतो. यातून मतदारांचे समाधान होवू शकत नाही. यामुळे निधीमध्ये वाढ करावी. उपरोक्त मागणीला अन्य सदस्यांनी संमंती दिली. कमी निधीमुळे विकासकामे राबवताना अडचण येत असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.

गोजगा शाळा मंदिरात 

गोजगा प्राथमिक मराठी शाळेची इमारत पावसाने कोसळली आहे. उर्वरित इमारत धोकादायक बनली आहे. यामध्ये वर्ग भरवणे अवघड बनत आहे. यामुळे शिक्षकांनी वर्ग गावातील मंदिरात भरवायला सुरुवात केली आहे. 22 पासून शाळा सुरू होणार आहेत. तरीदेखील शाळा दुरुस्ती कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शाळा इमारत बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली.

यावेळी जि. पं. आरोग्य आणि शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल,  सदस्या माधुरी हेगडे, शांता जैनोजी, मोहन मोरे, सिद्दू सुणगार यांनी तालुक्यातील समस्या मांडल्या. 

उचगाव भागात गणवेश समस्या

प्राथमिक शाळा सुरू होवून सहा महिन्याचा कालावधी झाला आहे. तरीदेखील उचगाव विभागातील प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गातील मुलांना गणवेश पुरवठा झालेला नाही. विशेष म्हणजे शिक्षण खात्याकडून पालकांना गणवेश पोहोचल्याचा संदेेश मिळाला आहे. यामुळे पालकांकडून विचारणा होत असून गणवेश वितरणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करण्याची मागणी बैठकीत केली.