Tue, Jan 19, 2021 23:42होमपेज › Belgaon › काँग्रेस राजवटीत भरीव विकासकामे

काँग्रेस राजवटीत भरीव विकासकामे

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:37PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

गेल्या साडेचार वर्षात राज्यातील काँग्रेस सरकारने भरीव विकासकामे केली आहेत. यामध्ये निपाणी मतदासंघात माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे सुरू असून येत्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदासंघात काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा विश्‍वास जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्‍त केला.

रविवारी शासकीय विश्रामगृह येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आ. काकासाहेब पाटील, माजी आ. सुभाष जोशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप जाधव, नगराध्यक्ष विलास गाडीवडर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, उत्तम पाटील, पंकज पाटील, सुजय पाटील, अशोककुमार असोदे, जि.पं.सदस्य राजेंद्र वड्डर, ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, सचिन केस्ते, निकू पाटील आदी उपस्थित होते.

ना. जारकीहोळी म्हणाले, भाजपने किती जरी खोटा प्रचार केलातरी पुन्हा राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. मागील वेळी निपाणी मतदासंघात बेकीमुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला. मात्र, यावेळी एकसंघपणा टिकवून काँग्रेस विधासभा निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहे. 

गोकाकप्रमाणे निपाणीतही भूमिगत वीजवाहिन्यांठी ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांची  दोन दिवसांपूर्वी आपण व काकासाहेब पाटील यांनी भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे लवकरच या कामाला गती येणार आहे.  चिकोडी तालुक्यात काही गावांच्या समावेशासंदर्भात निपाणी तालुका प्रलंबित राहिला होता. त्यावर चर्चा झाल्याने निपाणी तालुक्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

तत्पूर्वी ना.जारकीहोळी यांनी माजी.कै. रघुनाथराव कदम (दादा) तसेच माजी आ. प्रा. सुभाष जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. मतदारसंघातील बेनाडी, अकोळ, कोडणी, मांगूर, बेडकिहाळ, कुर्ली,आप्पाचीवाडी, भोज, कारदगा, माणकापूर, ममदापूर, हुन्नरगी, कोगनोळी, पडलिहाळ आदी गावातील कार्यकर्त्यांनी ना. जारकीहोळी यांच्याशी संवाद साधत  विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले

यावेळी बाबासो नोरजे, बाबुराव खोत, श्रीनिवास संकपाळ, अशोक पाटील, विष्णू कडाकणे, महेश पाटील, लक्ष्मण आबणे, के.डी.पाटील, बंडा पाटील, अरूण निकाडे, नासीरखान इनामदार, पुंडलिक भेंडुगळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.