Sat, Feb 29, 2020 18:24होमपेज › Belgaon › पूरग्रस्तांची कामे तत्काळ पूर्ण करा

पूरग्रस्तांची कामे तत्काळ पूर्ण करा

Published On: Sep 17 2019 1:50AM | Last Updated: Sep 16 2019 11:03PM
बेळगाव : प्रतिनिधी

अतिवृष्टी आणि पुरामुळे  थांबलेली विकासकामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, कामात हयगय करू नका, अशा सूचना महापालिका आयुक्‍त अशोक दुडगुंटी यांनी सर्व अभियंत्यांना केल्या.
गणेश मूर्ती विसर्जनानंतर सोमवारी (दि. 16) विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्‍तांनी आपल्या कक्षात दोनवेळा बैठका घेतल्या. त्यामध्ये विकासकामांचा आढावा घेतला.

महापालिकेला शंभर कोटी निधी मिळाला आहे. शिवाय विशेष निधीतून शहरात विविध कामे सुरू आहे. ती अर्धवट असल्यामुळे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व अभियंत्यांनी शिल्‍लक  कामे आवरून विकासकामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना केल्या. या कामात कोणाकडूनही हयगय खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. विविध विकासकामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

बैठकीला शहर अभियंते गंगाधर ई., अभियंता लक्ष्मी निपाणीकर, सहायक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर, एस. एच. मुर्तेण्णावर, व्ही. एस. हिरेमठ, आर्शिया तरनूम, अनुप कनोज, पी. एन. परशुराम आदी उपस्थित होते. त्यानंतर आरोग्य विभागाची बैठक झाली. आरोग्याधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा, पर्यावरण अभियंते आदिलखान पठाण, महादेवीम्मा आदी उपस्थित होते.

संध्याकाळीही बैठक ः महापालिका आयुक्तांनी सकाळी आणि संध्याकाळीही अधिकार्‍यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या.