Wed, Sep 23, 2020 20:23होमपेज › Belgaon › लोकसभेसाठी अर्ज असतो तरी कसा?

लोकसभेसाठी अर्ज असतो तरी कसा?

Published On: Mar 29 2019 1:36AM | Last Updated: Mar 28 2019 11:01PM
बेळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असून अर्ज मोफत दिला जातो. त्यासाठी उमेदवाराचे नाव, मोबाईल क्रमांक, पक्षाकडून अर्ज भरणार की अपक्ष, अर्ज केव्हा भरणार याची नोंद रजिस्टरमध्ये करुन अर्ज स्वीकारणार्‍याची स्वाक्षरी घेतली जात आहे. 

अर्ज एकूण 44 पानी असून कन्नड व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. अर्जात मालमत्ता, बँक खाते माहिती, सूचकांची नावे, अर्जासोबत प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. सर्व  प्रमाणपत्राची पूर्तता करुन संपूर्ण अर्ज भरलेला असेल तरच तो निवडणूक अधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी स्वीकारत आहेत.

अर्ज भरताना आवश्यक बाबी

नमुना अर्ज 2 ए वर उमेदवाराची सही आवश्यक   अर्जासोबत सामान्य उमेदवारासाठी अनामत रक्‍कम 25 हजार व अनुसूचित जाती, जमातींसाठी 12 हजार 500 रु. आवश्यक.   अनुसूचित जाती, जमातीसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक   सामान्य उमेदवाराला जात प्रमाणपत्र सक्तीचे नाही.  आपला मतदारसंघ सोडून दुसर्‍या मतदारसंघातून अर्ज भरणार असेल तर तहसीलदारांचे पत्र आवश्यक.   100 रु. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक.   प्रतिज्ञापत्रात  मूळ प्रमाणपत्रासह नोटरी प्रमाणपत्र आवश्यक.   उमेदवाराचे नाव, मतदारसंघाचा उल्लेख   मतदान ओळखपत्रावर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे नाव असणे आवश्यक.  उमेदवारांच्या सह्यांचे नमुने  विहित प्रमाणपत्र  राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाकडून अर्ज दाखल करीत असल्यास नमुना ए व बी प्रमाणपत्र आवश्यक  राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाकडून अर्ज दाखल करीत असल्यास बेळगाव मतदासंघातील दोन सूचक आवश्यक.  अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावयाचा असल्यास दहा सूचक आवश्यक  राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते सुरु करणे आवश्यक. त्या खात्याच्या पासुकचे झेरॉक्स आवश्यक.  तीन महिन्याच्या आतील पाच फोटो : त्यापैकी उमेदवार अर्जावर, दुसरा मतपत्रिकेवर, तिसरा निवडणूक चिन्हाशेजारी, चौथा निवडणूक रजिस्टरमध्ये लावला जातो. शिवाय एक फोटो जादा आवश्यक. 

अर्जाची प्रक्रिया

 अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ : 28 मार्च
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल 
अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल
मतदान : 23 एप्रिल मतमोजणी : 23 मे