Thu, Sep 24, 2020 08:21होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांचे सहकारी व माजी आमदार राजण्णा यांचे भाकित

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार कोसळणार 

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 11:14PMतुमकूर : प्रतिनिधी 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील निजद आणि काँग्रेस युतीचे सरकार कोसळेल, असे भाकित माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सहकारी व मधुगिरीचे माजी आमदार राजण्णा यांनी केले आहे. 

मधुगिरीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजण्णा यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात स्थिर सरकार देण्याची चिन्हे युतीकडून सध्या तरी दिसत नाहीत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तसे संकेत यापूर्वी दिले आहेत. मी जनतेच्या नसून काँग्रेसच्या दयेमुळे या पदावर आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी बाबत घुमजाव केले आहे. ही अस्थिर सरकारचीच लक्षणे आहेत. शेतकर्‍यांची कर्जमाफी होईपर्यंत तरी सरकार टिकावे, असे राजण्णा यांनी म्हटले आहे. राजण्णा हे अपेक्स बँकेचे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. 

निवडणुकीपूर्वी निजदने अनेक आश्‍वासने दिली आहेत. सत्तेवर आल्यानंतर 24 तासात शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी देवू, हे त्यातलेच एक महत्त्वाचे आहे. परंतु यासह इतर आश्‍वासनांची पूर्ती कितपत होईल याबाबत साशंक असल्याचे खुद्द कुमारस्वामी यांनीच म्हटल्याची आठवण राजण्णा यांनी यावेळी करून दिली. मुख्यमंत्र्यांनी बीपीएल कार्डधारकांना 35 किलो तांदुळ देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याची पूर्तता न झाल्यास निदर्शने करण्यात येतील, असा इशारा राजण्णा यांनी दिला आहे.