Tue, Sep 22, 2020 00:53होमपेज › Belgaon › महापालिका पोलिस खात्याला देणार चार ड्रोन

महापालिका पोलिस खात्याला देणार चार ड्रोन

Last Updated: Oct 17 2019 11:56PM
बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी महापालिका पोलिस खात्याला चार ड्रोन आणि सीसीटीव्ही देणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा प्रादेशिक आयुक्‍त अमलान बिस्वास यांनी विविध विकासकामांची पाहणी करताना दिली.

प्रशासक बिस्वास यांनी गुरुवारी महापालिकेत बैठक घेतल्यानंतर शहराची पाहणी केली. पहिल्या रेल्वे फाटकाची पाहणी केल्यानंतर ते म्हणाले, या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. बॅरिकेट्स लावण्यात आल्यामुळे लोकांना अडचण येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एका बाजूने लोकांना ये?जा करण्यासाठी जागा सोडण्यात यावी. तेथून वाहने जाणार नाहीत, अशा पद्धतीने बांधकाम करावे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पोलिस खात्याला 1 कोटी 25 लाख रुपये देणे लागतात. पण, ही रक्‍कम न देता चार ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात यावेत. त्यामुळे वाहतूक आणि कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल, असेही बिस्वास यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक श्रीनिवास हांडा यांनी पहिल्या रेल्वे फाटकाजवळ होण्यार्‍या वाहतूक कोंडीबाबत माहिती दिली.

त्याआधी प्रशासक बिस्वास यांनी पी. बी. रोडवरील मोडक्या बाजाराला भेट दिली. त्याठिकाणी पूरकाळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याची पाहणी करून नव्याने बांधकाम करुन देण्यात येईल, असे सांगितले. 

त्यानंतर त्यांनी हनुमाननगर येथील टेनिस कोर्ट आणि कुमारस्वामी ले?आऊटजवळील उद्यानाला भेट दिली. यावेळी आयुक्त जगदीश के. एच., उपायुक्त एस. बी. दोडगौडकर, शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर, सहाय्यक कार्यकारी अभियंते सुरेश मुर्तेण्णावर आदी उपस्थित होते.

उड्डाण पूल उभारणार

पहिल्या रेल्वे फाटकाजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाण पूल उभारण्याचे नियोजन आहे. ते काम कशा पद्धतीने करता येईल, याची माहिती प्रशासक अमलान बिस्वास यांनी घेतली.

 "