Sun, Jun 07, 2020 02:34होमपेज › Belgaon › साडेचार लाखाचा मद्यसाठा जप्त

साडेचार लाखाचा मद्यसाठा जप्त

Last Updated: Nov 08 2019 11:25PM
बेळगाव ः प्रतिनिधी  

अपार्टमेंटमधील भाडोत्री खोलीवर सीईएन पोलिसांनी  छापा टाकून 4 लाख 42 हजारचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी  राजेश केशव नायक (वय 37 रा. कुमारस्वामी लेआऊट) याला अटक करण्यात आली आहे. 

कॅम्प पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या विनायकनगर येथील अर्पण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये  राजेश हा भाडोत्री राहतो. या ठिकाणी तो बकायदेशीरपणे मद्यसाठा करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन एसीपी महांतेश्वर जिद्दी यांच्या मार्गदर्शनाखाली सीईएन गुन्हे विभाग पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यू. एच. सातेनहळ्ळीव त्यांच्या सहकार्‍यांनी छापा टाकून सदर कारवाई केली. यामध्ये विविध कंपन्यांच्या व गोवा बनावटीच्या 411 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच 4690 रु. रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
अटक करण्यात आलेल्या राजेश याच्यावर अबकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपनिरीक्षक एस एल देशनूर जयश्री माळगी, डी.एच.माळगी, एस.एल.अजप्पनावर, मारुती कुण्यागोळ, आदी कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.