Thu, Sep 24, 2020 10:43होमपेज › Belgaon › शेतकरी बेहाल, भाजप नेते मालामाल : ज्योतिराधित्य  सिंधिया

शेतकरी बेहाल, भाजप नेते मालामाल : ज्योतिराधित्य  सिंधिया

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:06AMखानापूर : वार्ताहर

खोटी आश्‍वासने देणार्‍या केंद्रातील भाजप सरकारने जनतेचे जगने मुश्किल करुन ठेवले आहे. प्रशासनाचे तीन-तेरा तर वाजलेच आहेत,  शिवाय देशाच्या साधनसंपत्तीत भांडवलशाहीची घुसखोरी करण्यास यांनी प्रोत्साहन दिले. घाम गाळून देशाला अन्न पुरविणार्‍या शेतकर्‍यालाही यांनी सोडले नसून त्यांच्या तोडचा घास पळविण्याचा प्रकार भाजपच्या सत्तेत सुरु आहे. या सर्वात शेतकरी बेहाल झाले आहेत तर यांचे नेते मालामाल झाले आहेत. असा आरोप मध्यप्रदेशचे खा.ज्योतिराधित्य  सिंधिया यांनी केला.

लोंढा ता.खानापूर येथे काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या प्रचारसभेतून ते बोलत होते. यावेळी लोंढा भागातील हजारोंच्या संख्यने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने डॉ.निंबाळकरांना पाठींबा दर्शविला. तसेच तरुणांनी काँग्रेस प्रवेशदेखील केला.

ते पुढे म्हणाले, डॉ.निंबाळकर यांनी विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्यात समाजकार्य करण्याचे जे धाडस केले आहे ते कौतुकास्पद आहे. दुर्गम खेड्यांचा विकास साधण्याची त्यांची तळमळ पाहाता येथील नागरीकांनी त्यांना मत देवून त्यांच्या कार्याला बळकटी देने कर्तव्य समजावे. 

लोंढा भागाने नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहून पक्ष बळकटीला प्राधान्य दिले आहे. काँग्रेसने नेहमी सर्व जाती धर्माला एकत्रित करुन समता, न्याय बंधूता आणि स्वतंत्र्य आबाधित राखण्याचा प्रयत्न केला.  त्याकरीता  येत्या निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी तसेच विकासासाठी काँग्रेसला मत द्या, अशी विनंती यावेळी डॉ.निंबाळकर यांनी केली.

यावेळी केपीसीसी चे प्रधान कार्यदर्शी पी.व्ही.मोहन, एआयसीसी सदस्य मनिकम ठाकूर, आय.जी.सनदी,  निरिक्षक गोपाळ नाईक, विजय पाटील, अशोक अंगडी, चंबान्ना होसमणी, अ‍ॅड.एन.आय.कोडोळी, समशेर मुजावर आदी उपस्थित होते.