Sat, Feb 29, 2020 19:45होमपेज › Belgaon › तुरमुरीत शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू

तुरमुरीत शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू

Last Updated: Nov 21 2019 12:35AM
उचगाव : वार्ताहर

शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या  शेतकर्‍याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. ही घटना  तुरमुरी  (ता. बेळगाव) येथे घडली.शंकर गल्ली तुरमुरी येथील शेतकरी बाळाराम भुजंग खांडेकर (वय 49) हे मंगळवारी दुपारी शेतामधील चारा आणण्यासाठी गेले होते. चारा कापून झाल्यानंतर गवताचा भारा बांधत असताना त्यांना सर्पदंश झाला.

त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा परिवार आहे.