Wed, Sep 23, 2020 21:16होमपेज › Belgaon › कडपट्टीत बनावट नोटा छपाई मशिन, कागद जप्त; दोघांना अटक

कडपट्टीत बनावट नोटा छपाई मशिन, कागद जप्त; दोघांना अटक

Published On: Nov 21 2018 1:07AM | Last Updated: Nov 20 2018 11:09PMजमखंडी : वार्ताहर

500 व 2000 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याच्या उद्देशाने कागद, छपाई मशिन, रसायन मोठ्याप्रमाणात संग्रह केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केल्याचे प्रकरण जमखंडी पोलिस ठाण्यात दाखल केले आहे.

जमखंडी तालुक्यातील कडपट्टी येथील रहिवासी श्रीमती सुवर्णा सिद्रामय्या मठद (वय 40) या महिलेच्या घरात बनावट नोटा छपाईची तयारी सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच बागलकोट जिल्हा पोलिस प्रमुख सी. बी. रिष्यंत यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी आर. के. पाटील, सीपीआय महांतेश होसपेट, पीएसआय एच. वाय. बालदंडी, दिनेश जवळकर, पोलिस एस. व्ही. कोळी, के. पी. सवदत्ती, ए. आर. झुंजुरवाड, श्रीमती सुधा पवार आदिनी धाड टाकून 500 ते 2000 रुपयांच्या नोटांच्या आकाराचा कागद, यंत्र, रसायन जप्त करून श्रीमती सुवर्णा सिद्रामय्या मठद व तिचा जावई राकेश शिवलिंग जंगम (वय 28) रा. मजलट्टी ता. चिकोडी यांना अटक केली. एकूण 291 बंडल असलेल्या नोटांची छपाई झाली असती तर त्याची किंमत 83 लाख 16 हजार 500 रुपये झाली असती असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या प्रकाराने जमखंडी परिसरात एकच चर्चा सुरू आहे. या कारवाईतील पोलिस अधिकारी व स्टाफला योग्य बक्षीस देण्याचे बागलकोट एस.पी. रिष्यंत यांनी जाहीर केले.