Sat, Sep 19, 2020 12:21होमपेज › Belgaon › ड्रग्ज धंद्याची ईडी चौकशी

ड्रग्ज धंद्याची ईडी चौकशी

Last Updated: Sep 17 2020 2:12AM

संग्रहीत फाेटाेबंगळूर : पुढारी वृत्तसेवा

सँडलवूडला धक्का देणार्‍या अमली पदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेले चित्रपट तारे व इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. एनसीबी आणि सीसीबी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये संशयितांनी देश-विदेशांत मोठ्या रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी बेनामी आर्थिक व्यवहार झाल्याने ईडीने चौकशीचा विचार सुरू केला आहे.

बंगळूरमध्ये झालेल्या पार्ट्यांसाठी बेनामी रक्कम मिळाली होती. अशा पार्ट्या अनेक ठिकाणी होत होत्या. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे येत होते. याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी ईडी तयारी करीत आहे. 

अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या नावेही बेकायदा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्री संजना गुलराणीला आणखी तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर दिगंत आणि ऐंद्रिता रे या स्टार दांपत्याची चार तास चौकशी करण्यात आली.

 "