Mon, Jan 18, 2021 08:39होमपेज › Belgaon › आर्मी वर्दीसाठी युवकांची गर्दी

आर्मी वर्दीसाठी युवकांची गर्दी

Last Updated: Nov 05 2019 12:56AM

शारीरिक चाचणीत पुलअप मारताना युवक.बेळगाव : प्रतिनिधी

लष्कर भरतीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यनिहाय भरतीची संधी युवकांना दिली जात आहे. सोमवारी (दि. ४) कर्नाटकातील युवकांना संधी दिल्याने सुमारे आठ हजार  युवकांनी गर्दी केल्याचे चित्र कॅम्प परिसरात पहावयास मिळाले.

सोमवारी सहाव्या दिवशी बेळगावात युवकांनी सैन्य भरतीसाठी गर्दी केली. ९ नोव्हेबरपर्यंत भरती प्रक्रिया चालणार आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर ही भरती होईल. ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या काळात महार बटालियन, पॅरा बटालियन व मद्रास बटालियन यांच्यातर्फे सैन्यभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी १८ ते ४२ वयोगटाची अट आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेळगावात युवक गर्दी करत आहेत. कर्नाटकासह महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, गोवा, दिव-दमन, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, लक्षदीप, पुदुचेरी व केरळ येथील उमेदवारांना भरतीसाठी संधी दिली आहे.

दहावीत किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता आहे. बारावीत किमान ६० टक्के गुण असण्याची अट आहे. क्‍लार्क पदासाठी संगणक व टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे. उंची १६० सेंटीमीटर, वजन ५० किलो, छाती न फुगवता ७० सें. मी. फूगवून ८२ सेंटीमीटर  असणे गरजेचे आहे. भरतीला येताना युवकांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, डोमीशीयल प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, २० पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत.अशी सूचना यापूर्वी भरती अधिकार्‍यांनी केली होती. त्यानुसार उमेदवार हजर झाले होते.

तेलंगणा, तमिळनाडूतील युवकांना आज संधी मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेश, तेलंगणातील युवकांना संधी देण्यात येणार आहे. यानंतर आठ दिवसांत निवड झालेल्या युवकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीत निवड झालेल्या युवकांना चाचणीसाठी  संधी मिळणार आहे.

पोलिसांकडून सहकार्याची भूमिका
मात्र, त्यांना काबूत आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला नाही. टप्प्याटप्प्याने युवकांना भरतीसाठी मैदानावर सोडण्यात येत होते. सोमवारी ३१ तारखेला पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील उमेदवारांनी गर्दी केल्याने हुल्लडबाजीचे कारण देत पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता.