Fri, Sep 25, 2020 15:05होमपेज › Belgaon › #Karnataka Bypolls; Live भाजपचे श्रीमंत पाटील विजयी

#Karnataka Bypolls; Live भाजपचे श्रीमंत पाटील विजयी

Last Updated: Dec 09 2019 12:31PM
कर्नाटकातील 15 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सोमवारी जाहीर होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोटनिवडणुकीत 67.91 टक्के मतदान झाले होते. एकूण 15 जागांपैकी किमान आठ जागा भाजपला मिळाल्यास बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदी कायम राहतील; अन्यथा सरकारवर गंडांतर येणार हे निश्‍चित आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

लाईव्ह अपडेट्स...

- येडियुराप्पा सरकार तरले? ११ जागांवर घेतली निर्णायक आघाडी
बेळगाव : भाजपचे श्रीमंत पाटील विजयी

बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथे डॉ. सुधाकर, यल्लापूर येथे शिवराम हेब्बार विजयी.

- भाजप १२ जागांवर आघाडीवर, काँग्रेस २ आणि अपक्ष एका जागेवर आघाडीवर
-कागवडचे श्रीमंत पाटील १३ व्या फेरीत १२८१२ मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरीनंतर गोकाक मतदारसंघात कांटे की टक्कर
गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांची १३२३ मतांची आघाडी

सकाळी ९:३०पर्यंतच्या मतमोजणीत
भाजप -रमेश जारकीहोळी - ४३९५
काँग्रेस- लखन जारकीहोळी- ३०७२
जेडीएस- अशोक पुजारी - १४९९
आघाडी- १३२३

बेळगाव जिल्ह्यात भाजप ९ जागांवर, काँग्रेस आणि जेडीएस प्रत्येकी दोन, अपक्ष १ जागेवर आघाडीवर 

- कर्नाटक पोटनिवडणूक- भाजप ९ जागांवर, काँग्रेस आणि जेडीएस प्रत्येकी दोन, अपक्ष १ जागेवर आघाडीवर 

- येल्लापूर, चिक्काबल्लापूर, महालक्ष्मी लेआउट मतदारसंघात भाजप आघाडीवर, शिवाजीनगर, हुनासुरूमध्ये काँग्रेस तर केआर पेटे येथे जेडीएस आघाडीवर, होसाकोटे येथून अपक्ष उमेदवार एस. के. बचेगौडा आघाडीवर.

- कर्नाटक : १५ जागांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

 "