Sun, Sep 20, 2020 06:42होमपेज › Belgaon › 'वैद्यकीय साहित्य खरेदीत कर्नाटक सरकारचा भ्रष्टाचार'

'वैद्यकीय साहित्य खरेदीत कर्नाटक सरकारचा भ्रष्टाचार'

Last Updated: Aug 04 2020 9:49PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदी केली आहेत. मात्र यात भ्रष्टाचार झाल्याने वैद्यकीय उपकरणे कमी दर्जाची असून याची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी विधानसभेचे माजी सभापती ए. आर. रमेशकुमार यांच्यासह अन्य कोंग्रस नेत्यांनी केली. 

अधिक वाचा : रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त अधिक

बेळगाव येथे याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री नजीर अहमद, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, माजी आमदार काकासाहेब पाटील, राजू कागे, बेळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विनय नावलकट्टी, राजु शेठ, लक्ष्मण इंगळे, अरविंद दलवाई, गजानन मंगसुळी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

यावेळी सर्व नेत्यानी वैद्यकीय साहित्य उपकरणे कमी दर्जाचे असून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक पुरेशा सुविधा मिळत नाहीत. शिवाय सुविधा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. यात अनेक नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या वैद्यकीय उपकरणे खरेदीची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी बेळगाव पत्रकार परिषदेत केली.

 "