Sat, Jul 04, 2020 14:30होमपेज › Belgaon › राज्यात 378 जणांना कोरोना

राज्यात 378 जणांना कोरोना

Last Updated: Jun 07 2020 12:25AM

संग्रहित छायाचित्रबंगळूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात शनिवारी पुन्हा कोरोनाबाधितांचे त्रिशतक झाले आहे. 378 जणांना कोरोनाची बाधा झाली असून एकूण आकडा 5,213 वर पोहोचला आहे. शुक्रवारी (दि. 5) राज्यात सर्वाधिक 515 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे राज्यभर खळबळ माजली होती. शनिवारी पुन्हा 378 जणांना लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार उडुपी येथे सर्वाधिक 121,  यादगिरीत 103, गुलबर्गा येथे 69, बंगळूर शहर 18, चिक्‍कमगळूर 24, विजापूर, दावणगेरी प्रत्येकी 6, बेळगाव 5, गदग 4, हासन, मंड्या, धारवाड, हावेरी येथील प्रत्येकी तिघे सापडले आहेत. राज्यातील 280 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याला दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत 1968 कोरोनामुक्त झाले आहेत.