Wed, Apr 01, 2020 01:44होमपेज › Belgaon › बेळगाव : सिगारेटसाठी काडेपेटी मगितल्याच्या रागातून तरुणाचा खून

बेळगाव : काडेपेटी मगितल्याच्या रागातून तरुणाचा खून

Last Updated: Jan 15 2020 1:36PM

बघ्यांची गर्दीबेळगाव : प्रतिनिधी

सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी मागितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना जुने बेळगाव येथे घडली. मोहम्मदसमीउल्ला मोहम्मदशफीउल्ला ( वय - ४५ रा. चित्रदुर्ग) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक वाचा : ‘नागरिकत्व’ कायदा घटनाविरोधी

याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, मृत तरुण हा ट्रक क्लिनर असून मंगळवारी रात्री तो जुन्या बी रोडवरील महाराजाबार जवळ दारू आणण्यासाठी गेला होता. या ठिकाणी त्यांनी राजू लोकरे नामक तरुणाकडे सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी मागितली. परंतु त्याने नाही म्हटल्यानंतर मोहम्मदसमीने त्याला शिवीगाळ केली. यानंतर राजू व त्याचे दोघे मित्र तसेच हा क्लिनर तरुण सर्वजण बाजूला असलेल्या शेतवडीत  दारू पीत बसले होते. यावेळी राजूने  त्या क्लिनरला काडेपेटी नाही म्हटल्यानंतर भांडण का काढलास असे म्हणत वाद घातला. यातूनच वादावादी होऊन तिघांनी क्लीनर तरुणाचा खून केला. या प्रकरणी एकाला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक राघवेंद्र हवालदार अधिक तपास करीत आहेत.

अधिक वाचा : संमेलन आयोजकांची मुस्कटदाबी