Sat, Feb 29, 2020 17:42होमपेज › Belgaon › विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर

विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:36AMबंगळूर : प्रतिनिधी

विधान परिषदेचे अकरा सदस्य 17 जूनला निवृत्त होत असून, या जागांसाठी 11 जूनला निवडणूक होणार आहे. त्याकरिता काँग्रेसने चार उमेदवार जाहीर केले आहेत. तर भाजपने अजूनही उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

सी. एम. इब्राहिम आणि के. गोविंदराजू यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. के. हरीशकुमार, अरविंदकुमार अरळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे बी. जे. पुट्टस्वामी, डी. एस. वीरय्या, सोमण्णा बेवीनमरद, रघुनाथराव मलकापुरे, भानुप्रकाश, तसेच काँग्रेसचे सी. एम. इब्राहिम, एम. आर. सीताराम, मोटम्मा, के. गोविंदराजू, भैरती सुरेश 17 जूनला निवृत्त होणार आहेत.