Sat, Sep 26, 2020 23:06होमपेज › Belgaon › काँग्रेस ? निजदचे २१:१३ सूत्र? 

काँग्रेस ? निजदचे २१:१३ सूत्र? 

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 12:27AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात भाजपला अपयश आल्याने विरोधी पक्षात आता सत्ता स्थापनेसाठी धूमशान सुरू  आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 104 जागा मिळविलेल्या भाजपने सरकार स्थापण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सभागृहाबाहेर पडण्याची वेळ येडियुराप्पांवर आली. त्यामुळे आता काँग्रेस आणि निजदला युती करून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे 21 व निजदचे 13 आमदार एकत्र येऊन युती सरकार स्थापन   करण्याच्या तयारीला जोर आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत राजधानी बंगळुरातील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या संयुक्‍त बैठकीत सरकार स्थापनेबाबत ऊहापोह करण्यात आला. सरकार स्थापण्यात भाजप आमदारांचा काही उपयोग नसला तरी वाटाघाटीला मात्र त्यांना निमंत्रित करण्यात आले होते, हे विशेषच म्हणावे लागेल.

काँग्रेस?निजदचे युती सरकार लवकरच स्थापन होत आहे. निजदचे  प्रदेशाध्यक्ष आमदार एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असे आश्वासन काँग्रेसने देऊनच निजदशी युती केली आहे. येत्या बुधवारी त्यांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. बहुमत सिध्द करण्यास त्यांनाही 15दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. कुमारस्वामी यांचा बुधवारी शपथविधी झाल्यास ते राज्याचे 25 वे मुख्यमंत्री असतील.

दरम्यान, रविवारी सायंकाळी झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीनंतर काँग्रेसमधील काही ज्येष्ठ आमदारांनी मंत्रीपद मिळविण्यासाठी माजी मुख्यंत्री सिध्दरामय्या यांच्या निवासस्थानी लॉबिंग चालविले असल्याचे समजून येते. बेळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांनीही मंत्रीपद मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. 

जारकीहोळी, हेब्बाळकरना मंत्रिपद ?

मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांबरोबरच बेळगावातील दोन आमदारांनीही जोरदार प्रयत्न चालविले आहेत. अ.भा.काँग्रेसचे सचिव यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी यांना साखरउद्योग खाते देण्याचा विचार पक्षाने चालविला आहे. तसेच बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा म्हणून गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत आहेत. पक्षसंघटन, महिला संघटना, महिला सबलीकरण कार्यात त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार पक्षाने चालविला आहे. महिला ?बालकल्याण खाते त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.