Sat, Feb 29, 2020 19:52होमपेज › Belgaon › शहापुरात फूस लावून गोंधळ घालण्याचा प्रकार

शहापुरात फूस लावून गोंधळ घालण्याचा प्रकार

Last Updated: Nov 17 2019 1:22AM
बेळगाव : प्रतिनिधी  

लोकमान्य सोसायटीच्या शहापूर शाखेसमोर घालण्यात आलेला गोंधळ फूस लावून  होता, असे लोकमान्य सोसायटीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. शहापूरमधील गोंधळाबाबत लोकमान्य सोसायटीने अधिकृत पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की : समाजकंटकांना फूस लावून ‘लोकमान्य‘चे कर्मचारीवर्ग आणि संबंधितांना धक्‍काबुक्‍की,अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ आणि ‘लोकमान्य’च्या अधिकारीवर्गासोबत हुज्जत घालून अकारण गोंधळ माजवण्यात आला.

ज्या ठेवीदारांना ठेवी परत घेऊन जायच्या आहेत, त्यांना त्या परत देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रामाणिक ठेवीदार सोसायटीशी संपर्क साधत असतानाच, ठेवीदार नसलेले तसेच गुंडप्रवृत्तीचे लोक गोंधळ घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, अफवांवर विश्‍वास न ठेवता ठेवी सुरक्षित आहेत, असे आवाहनही चेअरमन किरण ठाकूर यांनी केले आहे.

शहापूरमधील प्रकाराची कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून, बेळगाव पोलिस आयुक्‍तांनी सूचना दिली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.