Sat, Feb 29, 2020 19:35होमपेज › Belgaon › सीबीटीजवळून बालकाचे अपहरण

सीबीटीजवळून बालकाचे अपहरण

Published On: Nov 27 2018 1:21AM | Last Updated: Nov 26 2018 11:34PMबेळगाव : प्रतिनिधी

सीबीटीजवळून एका पाच वर्षांच्या बालकाचे दुचाकीस्वाराने अपहरण केल्याच्या घटनेची नोंद रविवारी रात्री मार्केट पोलिस ठाण्यात झाली आहे.नानाप्पा इराप्पा नाईक (वय 5, सध्या रा. बेळगाव, मूळ रा. उळागड्डी खानापूर, ता. हुक्केरी) असे बालकाचे नाव आहे. नानाप्पाची आई हालव्वा सीबीटीजवळ भाजीपाला विकते. आईसोबत आलेला नानाप्पा रविवारी दुपारी आजीकडे जातो, म्हणून गेला होता. पण, नानाप्पा तिकडे गेलाच नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर मार्केट पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिस निरीक्षक विजय मुरगुंडी अधिक तपास करीत आहेत. 

सीसीटीव्हीत दृश्य

पोलिसांनी सीबीटी चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक दुचाकीस्वार सदर बालकाला आपल्या दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी अपहरणाची नोंद केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकी दिसते; पण दुचाकीचा क्रमांक स्पष्ट न दिसल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत.