Wed, Aug 12, 2020 03:36होमपेज › Belgaon › बेळगाव : मंत्री शशिकला जोल्ले यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

बेळगाव : मंत्री शशिकला जोल्ले यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

Last Updated: Mar 26 2020 6:09PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेची बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी आज जिल्हा रुग्णालयाला धावती भेट देऊन पाहणी केली. कोरोना व्हायरस बाधित रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्थेचे जोल्ले यांनी कौतुक केले. 

जिल्हा रुग्णालय मध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आयसोलेशन कक्षाची वाढ तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला आणि पुरुष रुग्णांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र उपचार व्यवस्था तसेच १५ बेडची सुविधा यासर्वाची पाहणी आणि माहिती शशिकला जोल्ले यांनी घेतील. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने मास्क व आधी सुविधांची माहिती, त्याबरोबरच संशयित कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी तत्काळ चिकित्सा विभागासमोर ओपीडीमध्ये वाढ करण्यात आलेली व्यवस्था याची  पाहणी केली.  

कोरोना रोगामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीचे निर्णय घेऊन केलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी ठरले आहेत. यासाठी नागरिकांनी अधिक जागरूक राहून सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. असे आवाहनही जोल्ले यांनी यावेळी केले.

तसेच, रोगाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळासह खासदारांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी माहिती दिली.