Tue, Jul 07, 2020 17:18होमपेज › Belgaon › ‘तिसर्‍या डोळ्यावर’ही गुंगीचा अंमल

‘तिसर्‍या डोळ्यावर’ही गुंगीचा अंमल

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 03 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर तसेच उपनगरांममधू रात्री-बेरात्री, गावठी दारूंनी भरलेल्या रबरी ट्यूब्सची वाहतूक होत आहे. मात्र आश्यर्याची बाब अशी की वाहतूक होत असलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असतानाही ही दारुची वाहतूक कायम असल्याने चक्क ‘तिसर्‍या डोळ्यावर’ या गुंगीचा अंमल झाला आहे की काय? अशी चर्चा सुरु आहे. गोवावेस ते पिरनवाड पर्यंतचा संपूर्ण रस्ता हा सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजरेखाली आहे.

गोवावेस, तिसरे रेल्वे गेट , पिरनवाडी क्रॉस या मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते अशा पद्धतीने बसवण्यात आलेत की पादचारी, वा वाहन या कॅमेर्‍याच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. कोणतीही अनियमित बाब समोर आल्यास या कॅमेर्‍यासमोबत लावण्यात आलेल्या  लाउडस्पीकरवरून सूचना देण्यात येताता. विशेषतः रहदारी नियंत्रणाबाबत सूचना येतात. अनगोळ क्रॉसकडून तिसर्‍या रेल्वे गेटकडे तोंडावर  बुरखा घालून ट्यूबमधून एम-80 सारख्या दुचाकीवरून दारु वाहतूक करतात. रात्रीच्या वेळी रस्ता निर्जन असला रात्रपाळीतील काम संपवून परतणार्‍या कामगारांच्या नजरेस ते पडतात. रात्रीच्या वेळी सहसा पोलिस संशयास्पद हालचाली करणार्‍यांना हटकतात. बेळगाव तालुक्यात तसेच शहरातही गावठी दारु काकतीच्या जंगल भागातून तसेच महाराष्ट्रातून येते. उन्हाळ्यात काजूची दारुही पुरवली जाते. सध्या निवडणुकीचा काळ असल्याने दारुची मागणी वाढली आहे. 
 

Tags : CCTV,Belgaon,illegal Business , Crime