खानापूर (बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा
असोगा बंधाऱ्याचा उत्तर बाजूचा भराव (भोसगाळी गावाच्या बाजूचा) पुन्हा वाहून गेल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मलप्रभा नदीला आलेल्या पहिल्या पुरात मोठ्या प्रमाणावर लाकडांचे ओंडके बंधाऱ्यात येऊन अडकल्याने दरवाजे बुजून नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.
अधिक वाचा : बाळाला जन्म देण्यासाठी तिने केली तब्बल २८ किमी पायपीट!
लघू पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर बंधारा दुरुस्ती करण्याचे सांगण्यात येत आहे.