Sun, Sep 27, 2020 00:59होमपेज › Belgaon › फसवणुकीचा आकडा 7 कोटींचा 

फसवणुकीचा आकडा 7 कोटींचा 

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 07 2018 10:27PMबेळगाव: प्रतिनिधी

बेळगाव-खानापूरसह चंदगड तालुक्यातील 25 काजू व्यापार्‍यांची फसवणूक झाल्याचा अंदाज असून, या सर्वांचे सुमारे 7 कोटी रुपये घेऊन ठग फरारी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.  याप्रकरणी पोलिसात नोंद झाल्यानंतर दोघा संशयितांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी ‘पुढारी’ला दिली. 

काजू व्यापार्‍यांची फसवणूक झाल्याच्या घटनेची नोंद मंगळवारी वडगाव पोलिसांत झाली. या प्रकरणी सुमीत राजेश अनसानी व अमितकुमार (दोघेही रा. मुंबई) यांनी बेळगाव व खानापूर तालुक्यासह चंदगड तालुक्यातील अनेक काजू व्यापार्‍यांकडून तयार काजू घेतला.  त्याच्या बिलापोटी त्यांनी प्रत्येक व्यापार्‍याला चेक दिले. परंतु ते बाऊन्स झाल्याने व्यापारी हडबडले. व्यापार्‍यांनी दोघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे मोबाईल ट्रॅकिंगवर घातल्यानंतर ते कधी मुंबई तर कधी अहमदाबाद असे नेटवर्क दाखविते. सध्या तर त्यांचे नेटवर्क दिल्लीत दाखवित आहे. 
फसवणुकीच्या हेतूनेच काजू व्यापार्‍यांना विश्‍वास यावा यासाठी मुंबईच्या या भामट्यांनी आधी काही दिवस व्यवस्थित व्यवहार केला. सध्या काजू व्यापारात मंदी असल्याने या दोघांनी चांगला दर दिल्याने व्यापारी त्यांच्याकडे आकर्षिले गेले. आधीचा 1 कोटीपयर्र्ंतचा  व्यवहार त्यांनी नेटबँकिंगद्वारे सुरळीत केला. दिवाळीसाठी कोट्यवधींचे काजू विकत घेतले. इतकी मोठी रक्कम नेटबॅकिंगद्वारे हस्तांतरित करता येत नसल्याचे तांत्रिक कारण सांगत प्रत्येक व्यापार्‍याला त्यांनी धनादेश दिला. परंतु, त्या धनादेशावर बनावट सही तसेच खात्यावर रक्कमच नसल्याने ते बाऊन्स झाले. 

विशेष तपास पथक 

या प्रकरणाची पोलिसात नोंद झाल्यानंतर अद्याप पोलिसांनी गतीने तपास सुरू केलेला नाही. तरीही याच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ते लवकरच मुंबईला पाठवून संबंधित भामट्यांचा शोध घेतला जाईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. चार दिवसांवर टिपू सुलतान जयंती असल्याने पोलिस यंत्रणा बंदोबस्तात गुंतली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातच तपासाला सुरुवात होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चंदगडचा मध्यस्थ अडचणीत

मुंबईच्या भामट्यांना बेळगाव, खानापूर व चंदगड परिसरातील काजू व्यापार्‍यांची ओळख करून देण्यात चंदगडच्या पूर्वाश्रमीच्या काजू व्यापार्‍याने मध्यस्थी केल्याचे बोलले जाते. किरकोळ कमिशनच्या अमिषापोटी त्याने काजू संबंधित व्यापार्‍यांना पुरविला आहे. चंदगडमधील े 7 व्यापार्‍यांनी या भामट्यांना 1 कोटीचा काजू दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी या मध्यस्थीकडे बिलासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे हा मध्यस्थी अडचणीत आला आहे.