Sat, Feb 29, 2020 12:06होमपेज › Belgaon › गदारोळाने अधिवेशनाची सुरुवात

गदारोळाने अधिवेशनाची सुरुवात

Last Updated: Oct 11 2019 1:03AM
बंगळूर : प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाय प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणल्याने प्रतिनिधींनी विधानसौध परिसरात निदर्शने केली.

अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्यांनी पूरग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. पण, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कार्यसूचीप्रमाणे कामकाज होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पूरस्थितीबाबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यावर सुरुवातीला चर्चा नको असे स्पष्ट केले. यावरून सत्तारूढ व विरोधी   आमदारांत गदारोळ झाला. 

हिशोबकर यांना श्रद्धांजली
दरम्यान, पहिल्या दिवशी नियमाप्रमाणे नुकत्याच दिवंगत झालेल्या नेत्यांना, मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेळगावचे म. ए. समितीचे माजी आमदार अर्जुनराव हिशोबकर यांनाही अधिवेशनावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.