Mon, Aug 03, 2020 15:01होमपेज › Belgaon › हजारेंच्या सभेला संघटनांचा पाठिंबा

हजारेंच्या सभेला संघटनांचा पाठिंबा

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:21PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्या येथील आजच्या सभेच्या जागृतीसाठी गुरुवारी सायंकाळी  मोटारसायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. आज शुक्रवारी होणारी सभा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

स्नेहालय आणि भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समिती यांच्यावतीने अण्णा हजारे यांची सभा टिळवाडीतील व्हॅक्सीन डेपो येथे दुपारी 4 वा. होणार  आहे. हजारो नागरिक सहभागी होणार असून विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

ध. संभाजी चौकातून गुरुवारी जनजागृती फेरीला सुरुवात झाली. डोक्यावर ‘मैं हूं अण्णा’ असे लिहिलेल्या पांढर्‍या टोप्या आणि हातात तिरंगा घेतलेले कार्यकर्ते दुचाकीसह सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’च्या  घोषणा देण्यात आल्या. 

फेरी धर्मवीर संभाजी चौकातून किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, मुजावर गल्ली, हेमू कलानी चौक, पाटील गल्ली, उड्डाणपूल, कपिलेश्‍वर मंदिर, शहापूर, शिवाजी उद्यानापर्यंत फेरी काढण्यात आली. तेथे फेरीची सांगता झाली.

फेरीमध्ये नरेश पाटील, सुजित मुळगुंद, शेवंतीलाल शहा, गजानन धामणेकर, प्रा. वर्षा आजरेकर, भरमा कोलेकर, प्रतीक गुरव, महादेव पाटील, राजू मरवे, सुभाष लाड, नारायण मोदगेकर, संजय पाटील, शिवाजी पाटील, मोतिराम मोहिते, डी. एन. बाजीकर, संजय रायकर, शालन पाटील, माधुरी नेवगिरी, वंदना बेळगावकर, मंगला नंदिहळ्ळी व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

शुक्रवारी होणार्‍या सभेला गुरुदत्त मित्रमंडळ केळकर बाग, बांधकाम कामगार संघटना, टी. पावडर सेलर असोसिएशन, माउली महिला मंडळ केळकर बाग, सीनिअर सिटिझन असो., वाल्मिकी समाज, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केळकर बाग, मराठी युवा मंच, एल्गार सामाजिक साहित्य परिषद, शेतकरी बचाव संघटना, लक्ष्मीनगर युवक मंडळ, बेरड रामोशी संघटना, व्हिलेज वजुद, माजी सैनिक संघटना, बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, जायंटस मेन बेळगाव, शहर म. ए. समिती (टी. के. पाटील गट), भ्रष्टाचार निर्मूलन समिती, स्वराज्य संघटना, जय शिवराय युवक मंडळ कणबर्गी, मोटार कामगार संघटना, बालवीर सोशल फांउडेशन, नवहिंद परिवार, मित्रप्रेम युवक मंडळ गांधीनगर, राजमुद्रा सोसायटी परिवार, खानापूर रहिवासी संघटना, गुंजी सोशिएल फांऊडेशन, फुले युवक मंडळ, हल्याळ, कालिकादेवी युवक मंडळ हल्याळ, स्वराज्य महिला मंडळ रामदेव गल्ली, रोहिदासनगर, कोरे गल्‍ली गणेश मंडळ आदींनी पाठिंबा व्यक्त केला आहे. सभेला बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील हजारो नागरीक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.