Thu, Aug 13, 2020 17:53होमपेज › Belgaon › संमेलनातून नवोदित लेखकांना उभारी

संमेलनातून नवोदित लेखकांना उभारी

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 10:25PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने सुरू केलेल्या साहित्य संमेलनाला मातीचा सुगंध लाभलेला आहे. संमेलनाच्या माध्यमातून कष्टकरी, श्रमिक, वंचित आणि दलित समाजाच्या प्रश्‍नाना मांडण्यात येते. यातून नव्या लिहित्या हातांना उभारी मिळाली असल्याचा दावा संमेलनाध्यक्ष डॉ. माया पंडित यांनी केला. कॉ अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची सांगता रविवारी झाली. डॉ. पंडित समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. आनंद मेणसे, डॉ. संध्या देशपांडे उपस्थित होत्या.

संमेलनात घेण्यात आलेले ठराव

पत्रकार गौरी लंकेश, डॉ. एम. एम. कलबुर्गी, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या खुन्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी.
मुलतत्त्ववादामुळे सामान्यांचे जीवन भयग्रस्त होत आहे. यासाठी अशा शक्तींवर सरकारने त्वरित कारवाई करावी. बंदी आणावी.
देशातील उजव्या शक्तींनी सुरू केलेले इतिहासाचे पुनर्लेखन आणि विकृतीकरण तातडीने थांबवावे.
सीमाभागात सुरू असणार्‍या मराठी शाळा, ग्रंथालये, आणि साहित्य संमेलने यांना महाराष्ट्र सराकरकडून अनुदान मिळावे. 
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रोज होत असलेल्या हल्ल्यांचा आणि घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्य-संकोच आणि विकृत काव्याच्या दृश्य-अदृश्य प्रयत्नांचा हे संमेलन निषेध करत आहे.

कॉ. साठे यांचे साहित्य वैश्‍विक दर्जाचे