Fri, Sep 25, 2020 15:38होमपेज › Belgaon › क्रांतिकारी विचारांचा आज होणार जागर

क्रांतिकारी विचारांचा आज होणार जागर

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 10:47PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

येथील मराठा मंदिरमध्ये शनिवार दि. 16 व 17 रोजी  कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन होत आहे. यात प्रामुख्याने अण्णा भाऊंच्या परिवर्तनवादी व क्रांतिकारी वैचारिकतेचा जागर होणार आहे. या संमेलनास उपस्थित राहणार्‍या मान्यवरांचा परिचय पुढीलप्रमाणे.

प्रा. माया पंडित  : अध्यक्ष
डॉ. माया पंडित या डाव्या विचारधारेच्या आहेत. हैदराबादच्या व इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लॅग्वेजस या केंद्रीय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून काहीकाळ प्रकुलगुरुही होत्या. स्त्री चळवळ आणि मराठी नाट्यचळवळ यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. 

प्रा. डॉ. गणेश देवी : उद्घाटक
प्रा. डॉ. देवी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत.  भारतीय साहित्यातील श्रेष्ठ योगदानाची दखल घेऊन 2014 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केला आहे. 

प्रसाद माधव कुलकर्णी:
इचलकरंजी येथील समाजवादी, प्रबोधिनी या संस्थेचे सरचिटणीस असून प्रबोधन चळवळीला त्यांनी वाहून घेतले आहे. आजवर त्यांनी एक हजार व्याख्याने दिली आहेत. गझल साहित्यामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार लाभला आहे. 

सतीश काळसेकर:
सतीश काळसेकर उत्तम कवी म्हणून परिचित आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ते कामगार चळवळीतही क्रियाशील होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीतही त्यांचा निकटचा संबंध राहिला.

उत्तम कांबळे : 
उत्तम कांबळे हे ज्येष्ठ पत्रकार, संपादक, साहित्यिक आहेत. त्यांनी ‘आई समजून घेताना’ हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक गाजले.  

डॉ. भालचंद्र कांगो : 
प्रथम युवक क्रांती दलात कार्यरत राहून नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. सध्या ते महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. उत्तम कामगार नेते व उत्तम अभिनेते म्हणूनही ते ओळखले जातात. 

डॉ. अच्युत माने : 
डॉ. माने हे दलित पँथर संघटनेत कार्यरत असून निपाणी देवचंद महाविद्यालयात अनेक वर्षे अद्यापन केले आहे. निपाणी नगरपालिकेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात देवदासी प्रथा निर्मूलन मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. 

शीतल साठे : 
शीतल साठे लोकगीत गायिका, कवयित्री तसेच आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. लघुपट निर्माते आनंद पटवर्धन यांच्या कबीर कलामंचतर्फे जयभीम कॉम्रेड या चित्रपटात त्यांना गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 

सचिन माळी:
सचिन माळी हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असून त्यांनी कबीर कलामंचची स्थापना केली. 2011 साली एटीएसच्या पथकाने केलेली अटक, त्यानंतरचा तुरुंगवास, या मंचच्या सदस्यांचे भूमिगत होणे यावर साहित्य प्रकाशित आहे. 

मुक्ता अशोक मनोहर :
मुक्ता मनोहर या पुणे महानगर पालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी आहेत. 1975 पासून स्त्रियांच्या चळवळीत त्यांचा सहभाग आहे. कष्टकरी स्त्रियांच्या तत्कालीन आंदोलनात त्यांचा मोलाचा वाटा आहे.