होमपेज › Belgaon › पक्षी, प्राण्यांसाठी ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर ग्रुप’

पक्षी, प्राण्यांसाठी ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर ग्रुप’

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:25PMबेळगाव : प्रतिनिधी

प्राणी, पक्षी यांच्याविषयी समाजात जागृती निर्माण करणे, कृत्रा, मांजर, पक्षी आदी जिवांचे आजार व त्यावरील उपचारांकरिता कोणत्या उपाययोजना आखाव्यात यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. 

अ‍ॅनिमल वेल्फेअर ग्रुपची  रविवारी (दि.26) कॉलेज रोड, वनिता विद्यालयासमोर, स्वस्तिक चेंबर तिसरा मजला विटा येथे बैठक पार पडली. मार्व्हलस बेलगामचे वरूण कारखानीस, राकेश नंदगडकर, फेसबुक फे्ंरडर्स सर्कलचे संतोष दरेकर, विटाच्या विद्या हिरेमठ, सत्यन स्वामीनाथन, प्रा. भरमा कोलेकर आदींनी मार्गदर्शन केले.  

पशु चिकित्सालयात डॉक्टरांची भेट घेऊन लवकरच पुढील रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. ग्रुपमधील सर्वांना प्राथमिक उपचारासंबंधी माहिती देण्यात यावी आदी मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. 

सत्यन स्वामीनाथन म्हणाले, प्राण्यांवर उपचार करताना त्या प्राण्यांचा आजार आपल्याला होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचे प्रशिक्षण पशुवैद्यांकडून योग्य रितीने घ्यावे.

संतोष दरेकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांची भूक शमविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्राण्यांविषयीची समाजाची मानसिकता दूर करणे गरजेचे आहे.  

प्रा. कोलेकर म्हणाले, शहरात कुत्री, मांजर, पक्षी आदी मुकी जनावरे अपघातात जखमी होतात. याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. अशावेळी त्यांना तातडीने पशुचिकित्सालायात दाखल करणे गरजेचे असते. प्राणी व पक्षांच्या सुरक्षेसाठी हा चांगला उपक्रम आहे. 

अ‍ॅड. रोजलीन गोन्साल्विस म्हणाल्या, संघाच्या कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी लवकरच करण्यात येईल. सरकारकडे यासंबंधी पाठपुरवा करण्यासाठी पुढील पावले उचलण्यात यावीत. लक्ष्मी कंचूर व भाग्यश्री कुंचुर यांनी विचार मांडले.  मोहम्मद शाहिद, किशोरसिंग, आदर्श कडंगले, निकिता कुलकर्णी, राधिका भोसले, ओमकार अनवेकर, प्रसाद लोहार आदी उपस्थित होते. विद्या हिरेमठ यांनी आभार मानले.