Sat, Feb 29, 2020 19:01होमपेज › Belgaon › बेळगावात तोतया एसीबी अधिकार्‍याला अटक

बेळगावात तोतया एसीबी अधिकार्‍याला अटक

Last Updated: Oct 20 2019 1:25AM
बेळगाव : प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक  अधिकारी (एसीबी)  आणि प्रेस रिर्पोटर असल्याचे सांगून सरकारी अधिकार्‍यांकडून पैसे वसूल करणार्‍या तोतया अधिकार्‍याला सापळा रचून आरटीओमधून अटक करण्यात आली आहे. अतुल विश्वास कदम (वय 36, रा. शांतीनगर, टिळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मार्केट एसीपी नारायण बरमनी  यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय मुरगुंडी व सहकरार्‍यांनी सापळा रचून ही कारवाई केली. 

सरकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकार्‍यांना आपण एसीबी अधिकारी असल्याचे सांगून अतुल ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी आरटीओ अधीक्षक शरणप्पा हुग्गी यांनी मार्केट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. अतुल व झाकीर हुसेन मणियार हे दोघे आपण एसीबी अधिकारी व उत्तर कर्नाटक प्रेस रिर्पोटर आहोत, असे  हुग्गी यांना सांगत होते. तसेच तुमच्या विरोधात काही
जणांनी तक्रार केली असून, ती मिटवण्यासाठी भेट घ्या असे सांगून हुग्गी यांना या दोघांकडून वारंवार फोनवरून त्यांना बोलावले जात होते. 

त्यामुळे संशय आल्यानंतर हुग्गी यांनी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन एसीपी बरमणी व पोलिस निरीक्षक मुरगुंडी यांनी शनिवारी अतुलला रंगेहात पकडले. चौकशीत अतुल एसीबी अधिकारी व प्रेस रिपोर्टरच्या नावाने पैसे वसूल करीत असल्याचे स्पष्ट झाले. अतुलचे काही साथीदार यामध्ये असण्याचा संशय पोलिसांना असून,  त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून सापळ रचण्यात आला आहे.