Thu, Jul 09, 2020 07:20होमपेज › Belgaon › आठ वर्षीय बालिकेची अत्याचारानंतर हत्या

आठ वर्षीय बालिकेची अत्याचारानंतर हत्या

Last Updated: Dec 04 2019 1:05AM
गुलबर्गा : प्रतिनिधी

आठ  वर्षीय  बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे सोमवारी सायंकाळी उघडकीस आले. गुलबर्गा येथील सुळेपेठ गावानजीक  हा प्रकार घडला. 

याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. यल्‍लाप्पा (वय 35) असे त्याचे नाव आहे. सदर बालिका सोमवारी सकाळी 10.30च्या दरम्यान संशयितासोबत स्थानिकांना दिसली होती. सायंकाळी 5 नंतरही ती घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. शाळेत शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विचारण्यात आले; पण बालिका शाळेत आलीच नसल्याचे सांगण्यात आले. पालकांनी तातडीने  सुळेपेठ पोलिसांत धाव घेऊन  बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला. तोपर्यंत  ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.

बालिका शाळेला जाताना यल्‍लाप्पाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले. निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आणि गळा कापून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह मोठ्या गटारीत फेकून दिला. यावेळी तो दारूच्या नशेत होता. सुळेपेठ पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने सत्य कथन केले. त्याला अटक करण्यात आली आहे.