Thu, Jul 02, 2020 23:45होमपेज › Belgaon › बेळगावात आणखी 5 जण बाधित; 27 कोरोनामुक्‍त

बेळगावात आणखी 5 जण बाधित; 27 कोरोनामुक्‍त

Last Updated: Jun 07 2020 12:30AM

संग्रहित छायाचित्रबेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात आणखी पाचजणांना  कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी तिघे महाराष्ट्र आणि दोघे गुजरात येथून बेळगावात दाखल झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 264 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 27 रुग्ण कोरोनामुक्‍तही झाले आहेत. त्यामध्ये 23 जण बेळगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळे शनिवारी मोठा दिलासा मिळाला. 

आठवडाभरात परराज्यातून आलेल्या लोकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी  36 जणांना कोरोनाची लागण झाली होती. शनिवारी आणखी पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. बेळगाव तालुक्यातील अलतगा येथील एकाला बाधा झाली असून कोप्पळ येथील व्यक्‍ती बेळगावात क्‍वारंटाईन होता त्यालाही बाधा झाली आहे. तर हुक्केरी तालुक्यातील तिघांना कोरोना झाला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या 8 वर्षीय मुलगी, 

10 वर्षीय मुलगा 

आणि 35 वर्षीय व्यक्‍ती कोरोनाबाधित झाला आहे. तर गुजरातहून आलेल्या 23 आणि 40 वर्षीय पुरूषांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांना सरकारी  क्‍वारंटाईन करण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

गावांत संभ्रम

अनेक गावांत कोरोनाबाधित केवळ पाच दिवसांत निगेटिव्ह म्हणून परत आल्यामुळे गावांत संभ्रमाचे वातावरण होते. इतर लोकांना चौदाहून अधिक दिवस रुग्णालयात ठेवतात. पण, या लोकांना लवकर कसे सोडण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आरोग्य खात्याला विचारले असता, सदर लोकांच्या घशातील द्राव 25 मे रोजी घेतला होता. अहवाल 1 जूनला आला. त्यामुळे निर्धारीत वेळेत त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 27 जण निगेटिव्ह आले आहेत, असे सांगितले.