Thu, Feb 20, 2020 21:03होमपेज › Belgaon › तीनशे गुंडांची हजेरी

तीनशे गुंडांची हजेरी

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:18AMहुबळी : प्रतिनिधी

हुबळी-धारवाड शहरातील 300 गुंडांची विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहर पोलिस आयुक्‍त एम. एन. नागराज यांनी हजेरी घेऊन चौकशी केली. निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीच्या कालावधीत गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे आढळल्यास गुंडा कायदा लागू करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलिस खात्याने तुम्हाला सुधारण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. त्या संधीचा सदुपयोग तुम्ही करा, असे आवाहनही केले आहे.

पोलिस आयुक्‍तांनी वैयक्‍तिकरित्या गुन्हेगारांचा  पूर्वेतिहास, गुन्ह्यांचा तपशील तपासून पाहिला व प्रत्येकाकडून यापुढे आपण चांगली वर्तणूक ठेवू, असा बाँड लिहून देेण्यास बजावले. काही जणांना तर त्यांनी 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांचे बाँड्स सादर करण्यास सांगितले. 

हुबळी-धारवाडमध्ये एकूण 2,589 गुंडांचे रेकॉर्ड आहे. त्यांपैकी 900 जणांनी आतापर्यंत पोलिस खात्याने सांगितल्याप्रमाणे बाँड्स सादर केले आहेत. पोलिसांनी या सर्वच नोंद गुंडांवर आपले लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे. पोलिस खात्याने यापुढे मोहल्ला बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.  विधानसभेची निवडणूक निर्भयपणे होण्यासाठी पोलिस खात्याने हा कठोर पवित्रा घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

Tags : Hubli, Hubli news, crime, police, hooligan, attendance,