Thu, Sep 24, 2020 07:55होमपेज › Belgaon › कॅम्पमध्ये 3.5 किलो गांजा जप्‍त

कॅम्पमध्ये 3.5 किलो गांजा जप्‍त

Last Updated: Nov 30 2019 11:59PM
बेळगाव : प्रतिनिधी  

तब्बल साडेतीन किलो गांजा विकण्यासाठी आलेल्या तिघांना कॅम्प पोलिसांनी कॅम्पमधून अटक केली. हा गांजा महाराष्ट्रातून तस्करी करून आणण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

राजू उर्फ  रियाज हुसेनसाब औटी (रा. तेरदाळ, जि.बागलकोट), सैफान नियाज इनामदार (रा. स्टेशन रोड कुभा गल्‍ली, कुडची, ता. रायबाग), परमेश्‍वर सुब्बव्वा कांबळे (रा. बाळीगेरी, ता. अथणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कॅम्प पोलिस स्थानकाच्या व्याप्‍तीत संशयित  खुलेआम गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  पोलिसांनी सापळा रचून गांजा विकतानाच त्या तिघांना पकडले. 

हातपिशवीमध्ये गांजाच्या पुड्या करून विक्री  सुरू होती. असा साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 1 लाख रु. होते. अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून हा गांजा महाराष्ट्रातून आणून विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे. 

कॅम्प पोलिस निरीक्षक संतोषकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक मंजुनाथ, बी. आर. डूग, एम.  वाय. हुुक्केरी, सी. एन. सिद्धगौडा, जे. एम. मगदूम, बी. बी. गौडर, एम. ए. पाटील, बी. एम. कल्‍लाप्पन्‍नावर, बी. एम. नरगुंद, ए. बी. घट्टद आदी कर्मचार्‍यांनी कारवाईत भाग घेतला. 

 "