Thu, Sep 24, 2020 06:10होमपेज › Belgaon › 27 युवकांची गुलबर्गा येथे केली रवानगी

27 युवकांची गुलबर्गा येथे केली रवानगी

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:21AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सोमवारी रात्री खडक गल्लीत व आसपासच्या संवेदनशील परिसरात झालेल्या दंगलप्रकरणी 27 समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी खडेबाजार पोलिसांनी 23 जणांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांची गुलबर्गा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खडेबाजार पोलिसांनी चारजणांना अटक करून त्यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. 

अटक केलेल्यांमध्ये  इकबाल वहाब खत्री, मोहम्मदयुसूफ अब्दुल रेहमान खत्री, मोहम्मदरफिक अब्दुल अजिज खत्री, मोहसिनबशिर अहमद जमादार, रशिद मुजम्मिल खत्री, मोहम्मदइसाक  हुसेनजी खत्री, सलमान इरशादअहमद खत्री, अब्दूल करीम  मोहम्मद  युसूब खत्री, महंमद यूनीसमही बाशा, शफीउल्ला अब्दुला खत्री, महंमदशाहरूक महंमद माजिद मनसुरी, महंमद वारीस महंमद याकूब खत्री, शहाबुद्दीन फकरूद्दीन खत्री, अब्दूल कुदसा मोहम्मद हारून खत्री, मैनोद्दीन फकरूद्दीन खत्री, महम्मदसादिक  महम्मद  आयुब खत्री,  महम्मद सिद्दी नुरअफताब खत्री, महम्मद हारून अब्दूल रशिद खत्री सर्वजण रा. बाशिबान कंपाऊंड तसेच  तबरेज मैनुद्दीन शहापूर,  अब्दुल अस्लम ताशिलदार दोघेही रा.काकतीवेस  व अरबाज खान सरवर खान पठाण रा.चांदू गल्ली यांचा समावेश आहे. 
खडेबाजार पोलिसांनी रोहन महादेव शिंदे, तुषार शिवाजी शिंदे, रामा महादेव टोपकर तिघेही रा. भडकल गल्ली तसेच संजय रामा पाटील रा. पाटील गल्ली यांना अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या 27 जणांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि 143, 147, 148, 153 अ, 332, 333, 307, 427, 435, 353, 436 व सहकलम 149 अंतर्गत  दोन धर्मियात तेढ निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे आहेत. 23 जणांना मंगळवारी सकाळी जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले.