Tue, Jul 14, 2020 12:37होमपेज › Belgaon › राज्यात दिवसात 19 मृत्यू

राज्यात दिवसात 19 मृत्यू

Last Updated: Jun 30 2020 8:01AM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात सलग दुसर्‍या दिवशी हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले. सोमवारी 1,105 रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 14292 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोना संसर्गाने 19 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 226 कोरोनाबळी ठरले आहेत. दिवसभरात 17 जणांना डिस्चार्ज दिल्याने कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या 7683 झाली.

बंगळूर शहर जिल्ह्यात सलग 

तिसर्‍या दिवशी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले. सोमवारी 738 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान करण्यात आले. बळ्ळारी 76, मंगळूर 32, बिदर 28, कारवार 24, गुलबर्गा 23, हासन 22, विजापूर 22, तुमकूर 18, उडपी 18, धारवाड 17, चिक्‍कमगळूर 17, चिक्‍कबळ्ळापूर 15, यादगिरी 9, मंड्या 8, म्हैसूर 6, शिमोगा 5, रायचूर 4, बागलकोट 4, कोलार 4, बंगळूर ग्रामीण 3, दावणगिरी 2, रामनगर 2, हावेरी 1, कोडगू 1 असे जिल्हानिहाय रुग्ण आढळले.
बळ्ळारीतील 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. बंगळूर शहरात तीन, बागलकोट, रामनगर, हासन, मंगळूर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.